उस्मानाबाद/Usamanabad/liveNationNews
प्रतिनिधी/बिलाल कुरेशी
उस्मानाबाद शहरातुन वाहणारी भोगावती नदी स्वच्छ करुन, नदिच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी टिकाऊ संरक्षीत कॅनॉल पद्धतीच्या स्लोप भिती बांधुन कायम स्वरूपी स्वच्छतेची व्यवस्था करणे बाबत शरहातील नागरीकाचे सहयाचे निवेदन उस्मानाबाद चे जेष्ट विधिज्ञ ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. डॉ. तानाजी सावंत साहेब यांना दि. २६ जानेवारी २०२३ रोजी दिले होते. निवेदन देते वेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके, अनिल खोचरे, आनंद सतिषराव पाटील, सनि पवार, हरि शिंदे व प्रनिल रणखांब हे उपस्थीत होते व त्यांनीही भोगावती नदी स्वच्छतेसाठी ॲड. शिंदे यांच्या निवेदनाच्या बाबतीत व मागील वर्षापासुन मागणी करत असल्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. तानाजी सावंत साहेब यांना सांगितले. त्या निवेदनाची जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. डॉ. तानाजी सावंत साहेब यांनी दखल घेतली आणि जिल्हाधिकारी व नगर विकास प्रशासन यांना प्रचलित कायदे व नियमानुसार अनुज्ञेय कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. या बाबत उस्मानाबाद जिल्हा नगर विकास विभाग चे जिल्हा सह आयुक्त श्री. सतिश शिवणे साहेब यांनी दि. ३०/१/२०२३ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तातडीचे पत्र पाठवुन आदेशित केले आहे की, मा. ना. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देषाप्रमाणे व निवेदनाच्या मागणीप्रमाणे प्रकरणाची योग्य ती चौकशी करून, प्रकरणासंबंधी सर्व अधिनियम, तरतुदी तपासून नियमोचीत कार्यवाही करावी व निवेदन कर्तास कळवून अहवाल सादर करावा असे आदेशित केले आहे. त्याची एक प्रत माहीस्तव निवेदनकर्ते ॲड. विश्वजीत शिंदे यांना देण्यात आली आहे. यावरून भोगावती नदीची स्वच्छता होऊन उस्मानाबादकरांना चांगले पर्यावरण व आरोग्य लाभेल अशी आशा ॲड. विश्वजीत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. डॉ. तानाजी सावंत साहेब यांनी अनेक वर्षा पासुन प्रलंबीत भोगावती नदिच्या स्वच्छते बाबत आणि लोकांच्या चांगल्या आरोग्याच्या विचार करून निवेदनाची दखल घेतली व उस्मानाबादच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व विकासाठी प्रयत्नशिल असल्या बद्दल ॲड. विश्वजीत शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षा चे दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय सांळुके व श्री. सुरज साळूंके इ. उपस्थित होते.
0 Comments