Header Ads Widget


नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते तळोदा पोलीस ठाणे येथे वाचनालयाचे उद्घटन


नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील हे दिनांक 06/02/2023 ते दिनांक 09/02/2023 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दिनांक 07/02/2023 रोजी तळोदा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी पोलीस ठाणे येथे गेले असता तळोदा पोलीस ठाणे येथे वाचनालयाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

नंदुरबार पोलीस दल हे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेले वाचनालय, व्यायाम शाळा, महिला पोलीस अंमलदारांसाठी विश्राम कक्ष इत्यादी चांगल्या उपक्रमांचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील यांनी कौतुक केले. पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

24 तास कामात नेहमीच व्यस्त असणाऱ्या पोलीस अधिकारी व अमंलदारांनी नियमीत वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होत असतो. तसेच आपले   ज्ञान वृध्द्ींगत होवून त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात होत असतो, त्यामुळे नियमीतपणे वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. तसेच पोलीसांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद देखील जोपासले पाहिजे म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून वाचनासाठी थोडा वेळ काढुन नियमीत वाचन केले पाहिजे तसेच माणसाला ज्याप्रमाणे जीवन जगत असतांना अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मेंदूला खाद्याची गरज असते आणि मेंदूचे खाद्य म्हणजेच वाचन असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील यांनी वाचनालय उद्घाटन प्रसंगी सांगितले.  पोलीस ठाणे येथील वाचनालयात पोलीस पाल्यांसाठी व पोलीस अंमलदारांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असलेले योग्य ते सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या पाल्यांनी पोलीस ठाणे येथे उद्घाटन करण्यात आलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा,  असे उद्घाटन प्रसंगी सांगितले. 

तळोदा पोलीस ठाणे परिसराची पाहणी करुन तेथील पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून पोलीस ठाण्याचा गुन्हे आढावा घेतला. तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामाकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पंडित सोनवणे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

|