Header Ads Widget


मराठी पत्रकार संघाचे निवेदन ..आमदारांनी पत्रकारांविरुध्द दिलेली खोटी फिर्याद मागे घ्यावी,तसेच पोलिसांनी पत्रकारांवर लादलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.



नंदुरबार! Nandurbar/LivenationNews 
शहादा तळोदा मतदार संघाचे भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी स्थानिक वार्ताहर,जिल्हा प्रतिनिधी व संपादकांवर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा,यासाठी  पत्रकार भवनात नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने  बैठक घेण्यात आली. बैठकीत राजेश पाडवी यांचा तीव्र निषेध व्यक्त करीत आदिवासी विकास तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉ. हीना गावित यांना निवेदन देण्यात आले.दै.पुण्य नगरी व दै.दिव्य मराठीने शहादा येथील प्रभाग मधील 13 मधील रस्ते कामाबाबत स्थानिक रहिवाशांनी रस्ते काम निकृष्ट होत असल्याची निवेदनाची बातमी प्रसिध्द केली. यातून भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी शहादा पोलिस ठाण्यात 6 फेब्रूवारी 2023 रोजी  शहादा पोलिस ठाण्यात तक्रार करून मानहानी झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर दबाव टाकून खोटा गुन्हा नोंदविण्यात आल्याने ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्यासह सर्वच माध्यमांच्या पत्रकारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचा आरोप करीत राजेश पाडवी यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली. तसेच यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले, गुन्हे सहन केले जाणार नाहीत. तसेच संबंधित आमदाराने फिर्याद मागे घ्यावी. तसेच पोलिसांनी पत्रकारांवर लादलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे,अशी मागणी केली. सर्वच पत्रकारांच्या शिष्टमंडळाने विरल विहार येथील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांची भेट घेतली.
तसेच पत्रकारांवरील दाखल झालेले खोेटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे,अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पत्रकारांच्या भावना पोहचविण्यात येतील, असे आश्वासन मंत्री महाेदयांनी दिल्याने पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.
आमदारांनी तात्काळ गुन्हे मागे घेतले नाहीत तर यापुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हयात आंदोलने करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर रमाकांत पाटील, हिरालाल चौधरी, मनोज शेलार, धनराज माळी, राकेश कलाल, याेगेंद्र जोशी, रणजित राजपूत, बाबा राजपूत, रविंद्र चव्हाण, मुकेश सोमवंशी, महादू हिरणवाळे, राजू पाटील, भिकेश पाटील, निलेश पवार, गौतम बैसाणे, विशाल माळी, अविनाश भामरे, जीवन माळी, जगदिश सोनवणे, दिनू गावित, शैलेंद्र चौधरी, सतिष गाेसावी, दिलीप बडगुजर, हंसराज चौधरी, आफिज मिर्झा, अनिल राठोड, सुबोध अहिरे, दिपक सोनार, कल्पेश मोरे, मिलिंद भालेराव, महेश पाटील, जगदिश ठाकूर, जितेंद्र जाधव, राणा राजपूत, किशोर गवळी, नितीन पाटील, मनोज समशेर, ज्ञानेश्वर गवळे, पंकज सिंधी आदींच्या स्वाक्ष-या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|