Header Ads Widget


शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण येथील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर.....


प्रतिनीधी/बिलाल कुरेशी

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या व राज्यातील इतर संघटनाच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपात राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. महासंघाच्या व इतर संघटनाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु शासनाने सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्याने राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचारी 
20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर आहेत.

संपाचा दुसरा दिवस असून शासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा नसता बेमुदत संप असा चालू राहील. या संपात शरदचंद्र महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. या संपात मुख्य लिपिक श्री.मोगल एस एन, वरिष्ठ लिपिक.श्री पटेल एस एस, ग्रंथालय परिचर श्री.कापसे एस आर, तसेच सेवक श्रीमती शेख आर् एच, श्री.सोळंके एल के, श्री.काजी जी बी श्री.तांबोळी आय एस आदींनी शासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments

|