Header Ads Widget


भगदरीचा खुटंमाळ येथील वडील- पुत्राच्या घराला आग लागुन संपूर्ण घरच नष्ट झाले ,यावेळी नुकसान ग्रस्तांना योग्य ती मदत मिळण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्याना आवश्यक त्या सुचना दिल्या..

 

अक्कलकुवा! Akkalkuwa/LivenationNews
प्रतिनिधी /अल्ताफ मलकानी 



अककलकुवा तालुक्यातील भगदरीचा खुटंमाळ येथील बाप बेट्याच्या घराला आग लागुन संपूर्ण घरच नष्ट झाले.या घटनेची विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी भगदरी येथे भेट देऊन पाहणी केली दरम्यान  उग्राण्या सत्या वसावे सायसिग उग्राण्या वसावे या दोघांची आमदार आमश्या पाडवी यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

          दि १३ रोजी दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास विजेच्या शाॅटसर्किटमुळे भगदरी खुंटमाळपाडा येथे आग लागुन दोघे घरे जळाली यावेळी घरातील रोक रकमेसह चांदीचे दोन किलोचे दागिने ,कपाट पंलगासह संसारोपयोगी,लाकडी साहीत्यासह घराला असलेल्या सागवानी मोठे उभे,आडवे खांब, आदीं सह जीवनावश्यक संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते .यात बाप बेटा यांचे प्रत्येकी ४७८५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.आमदार आमश्या पाडवी यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन नुकसानाचा आढावा घेतला तसेच घटनेची अधिक माहिती जाणुन घेतली. यावेळी शिवसेनेचे कान्हा नाईक, मंडळ अधिकारी बापु जाधव, तलाठी गजानन पवार,ग्रामसेवक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भरतसिंग वसावे यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी नुकसान ग्रस्तांना योग्य ती मदत मिळण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी संबंधितांना आवश्यक त्या सुचना दिल्यात.

Post a Comment

0 Comments

|