Header Ads Widget


दोंडाईचा नगर परिषदेत कर्मचारी कार्यालयात, नेमप्लेट कपाटात, ओळखपत्र घरी


LiveNationNews Bulletin

दोंडाईचा : कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले नाव व पद दर्शविणारे ओळखपत्र(नेमप्लेट) दर्शनी भागात लावणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेतील कर्मचारी फक्त मंत्रालयातील मोठे अधिकारी किंवा मंत्री आले तरच टेबलावर आपल्या नावाची नेमप्लेट चढवतात आणि ओळखपत्र वापरतात अन्यथा नेमप्लेट कपाटात तर ओळखपत्र घरीच ठेवतात.
ओळखपत्रासंदर्भातील आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांना कार्यवाही करण्याचे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच पत्र दिले आहे. ग्रामीण भागातून शासकीय कार्यालयात आपल्या कामानिमित्त नागरिक येत असतात. दूरवरून आल्याने त्यांना शारीरिक व आर्थिकभार सोसावा लागतो. असे असताना शासकीय कार्यालयात त्यांना कामासंबंधी कर्मचारी वा अधिकारी यांच्याविषयी माहिती नसल्यास त्यांची अडचण होते. अनेकवेळा संबंधित कर्मचारी जवळून जात असले तरी लक्षात येत नाही. काही कामचुकार कर्मचारी आपली ओळख लपवित असल्याने नागरिकांची फसवणूक होते. हे प्रकार थांबविण्यासाठी राज्य सरकारने कर्मचारी वा अधिकारी यांनी आपले नाव व पदनाम दर्शविणारे ओळखपत्र दर्शनी भागात लावण्याविषयी निर्णय घेतला होता. मात्र, या आदेशाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी, हे प्रकार थांबविण्यासाठी राज्याच्या सामान्यप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. मीना यांच्या सहीचे पत्र सर्व विभागप्रमुखांना नुकतेच देण्यात आले असून ओळखपत्र धारण न करणाऱ्या कर्मचारी वा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेत अद्यापही झालेली दिसून येत नाही. त्यांच्या अधिनस्थ विभागप्रमुखही ओळखपत्र वापरत नसल्याने आपण कशाला घालायचे अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 

Post a Comment

0 Comments

|