Header Ads Widget


MPDA कायद्याअंतर्गत नागपूर येथे प्रतिबंधक कारवाई.

LiveNationNews Bulletin

नागपूर शहर, दि. २०/०१/२०२३.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेष कुमार यांनी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कोतवाली, बजाजनगर आणि इमामवाडा नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अनिकेत उर्फ पांडया रमेश पडोळे यास MPDA अंतर्गत स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अनिकेत उर्फ पांडया रमेश पडोळे, याचे विरूध्द पोलीस स्टेशन कोतवाली, बजाजनगर आणि इमामवाडा नागपूर येथे दारू पीऊन मारपीट करणे, जुगार खेळणे, घातक शस्त्रानिशी जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्रानिशी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातकशस्त्रानिशी गैरकायदयाची मंडळी जमवुन जिवे मारण्याची धमकी देऊन नुकसान करणे, प्राणघातक शास्त्र जवळ बाळगणे, अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन नुकसान करणे, शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, हदद्पार आदेशाचे उल्लंघन करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस उप आयुक्त, परि. क्र. 3, नागपूर शहर यांचे आदेशन्वये 02 वर्षाकरिता हदद्पार करण्यात आले होते. स्थानबध्द इसमावर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पोलीस स्टेषन कोतवाली हद्दीत प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, हदद्पार आदेशाचे उल्लंघन करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी, अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अनिकेत उर्फ पांडया रमेष पडोळे, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे तो सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवित असल्याने श्री गोरख भामरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. 3 यांचे मार्गदर्शनाखाली, व.पो.नि. मुकुंद ठाकरे, पोलीस स्टेशन कोतवाली, नागपूर शहर, यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला असता श्रीमती अश्वती दोर्जे व श्री. मुम्मका सुदर्षन, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रकटीकरण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद गुंडाविरुद्ध स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेष दिलेत. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. श्री. अमितेष कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|