Header Ads Widget


मारहाण प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना विसरवाडी पोलीस हेड कॉन्स्टेबल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले...




नंदुरबार!Nandurbar/LivenationNews

प्रतिनीधी/सईद कुरेशी 



नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलला( ८०००/-) आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडल्याची घटना घडली असून,


 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,विसरवाडी तक्रारदार व इतरांमध्ये झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होवू नये यासाठी ८ हजाराची लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ अटक करण्यात आली.


पोलिसांत गुन्हा दाखल होवू नये यासाठी ८ हजाराची लाच

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व इतर लोकांमध्ये झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवू न देण्याच्या बदल्यात विसरवाडी ता. नवापूर येथे कार्यरत असलेला पोलिस शिपाई दारासिंग जोरदार पावरा (३५) बक्कल नं.१०२ याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती (८०००/-)आठ हजार रुपये देण्याचे ठरले. सदर ८ हजाराची लाच पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, पोना मनोज अहिरे, अमोल मराठे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ.



अँन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार (दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|