अक्कलकुवा ! Akkalkuwa/Livenationews
प्रतिनिधी/ अल्ताफ मलकानी
अक्कलकुवा येथे सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोरापाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ मध्ये खापर येथील श्री दिव्यमणी इंग्रजी व मराठी मीडियम स्कूलच्या प्राथमिक गटातील इयत्ता आठवीच्या गरीमा पटेल व दिव्या पाडवी या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या नैसर्गिक दर्शक या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाचे दखल घेत संस्थेचे अध्यक्ष डी.जी.पाटील व सचिव अशोक जैन आणि शाळेच्या मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक अभिजीत पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकित डोंगरे यांनी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित केला.तसेच प्रितम जैन,संदीप शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनीच्या यशाबद्दल दोन्ही माध्यमाच्या सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
0 Comments