Header Ads Widget


अखिल भारतीय विद्रोही कार्यालयचे उद्घाटन..

प्रतिनिधी /वर्धा बुलेटीन

प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध मोठा विद्रोह-डॉ.प्रमोद मुनघाटेया प्रसंगी बोलताना डॉ.प्रमोद मुनघाटे म्हणाले की, सामाजिक लोकशाहीच्या बळकटीसाठी विद्रोहाची गरज आहे. समतेची ही परंपरा प्राचीन आहे. आधुनिक युगात जोतीराव फुले यांनी प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध मोठा विद्रोह केला. या विद्रोहातूनच मराठी साहित्यात विद्रोही साहित्याची परंपरा सुरू झाली. १७ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे त्याचेच द्योतक आहे. 

सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्ध विद्रोही साहित्याने उभारलेला आसूड नवीन मूल्य निर्मिती करणारा आहे. विषमतेला नकार आणि समतेला होकार अशी विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका असल्यामुळे, आजच्या दहशतीच्या काळात या भूमिकेच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. प्रस्थापित साहित्य संमेलनाला पर्यायी संमेलन म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाची गरज आहे. 

वर्तमानातील जगण्याची चिकित्सा करणारे साहित्य हे विद्रोही साहित्यच असते. या संमेलनातून शेतकरी, बहुजन, वंचितांच्या जगण्याचे सर्व संदर्भ, साहित्याच्या पातळीवर आणि संघर्षाच्या संदर्भात नव्याने मांडण्याचे धाडस विद्रोही लेखक, कवी, विचारवंतच करू शकतात. या दृष्टीने हे संमेलन ऐतिहासिक होईल याची मला खात्री आहे. आपण सर्वजण तन-मन-धनाने या संमेलनात संमेलनासोबत राहूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नितेश कराळे यांनी, वर्धा शहरात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेऊन उपस्थितांना संमेलनाची गरज आजच्या परिस्थितीत मोठी असल्याचे सांगितले. बहुजन वंचितांना आवाज देण्यासाठी स्वतःची ओळख दाखविण्यासाठी हे संमेलन असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments

|