अक्कलकुवा! Akkalkuwa/ LivenationNews
प्रतिनिधी /अल्ताफ मलकानी
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खापर येथील ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने खापर येथील युवासेना जिल्हा संपर्क कार्यालयावर युवासेना प्रमुख तथा खापर मा.उपसरपंच ललित जाट यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी ग्रामविकास परिवर्तन पेनेलचे विजयी ग्रामपंचायत सदस्य अश्विन पाडवी, करुणा पाडवी, महेश पाडवी,प्रमिलाबाई सदाराव,शोएब तेली,शिवसेना नंदुरबार जिल्हा संघटक तथा मा.उपसरपंच लक्ष्मण वाडीले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत ललित जाट यांनी ग्रामपंचायतील मिळालेल्या पराभवानंतर आपली विरोधी म्हणून असलेली ठाम भूमिका पत्रकारांसमोर मांडली.ते म्हणाले, पराभवानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागू,व जनतेला दिलेल्या जाहीर नामाप्रमाणे शब्दपूर्ती करू.त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे नाव ग्रामपंचायत ऐवजी अवैधरित्या ग्रामसंसद केलेल्या नावाला तात्काळ ग्रामपंचायत करून व ग्रामपंचायतीच्या लेटरहेड वर देखील ग्रामपंचायत नावाने उल्लेख व्हावा यासाठी योग्य तो पाठपुरवठा करणार आहे.तसेच घरकुल योजनेत वंचित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा,तलाठी,ग्रामसेवक,पोलीस पाटील व इतर दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावाच्या मध्यभागी ग्रामसचिवालयाचे निर्माण करावे, गावांच्या क्षेत्रफळ व लोकसंख्येला बघता एका घंटागाडी ऐवजी तीन घंटागाडी करून कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी,अशा अनेक अत्यावश्यक गरजांची पूर्तीसाठी आम्ही विरोधी पक्षांतील निवडून आलेले सर्व सहा सदस्य ठोस भूमिका मांडू.याकरिता आम्हास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली तर तीदेखील घेऊ. अशी माहिती ललित जाट यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
यावेळी मा.सरपंच रामसिंग पाडवी,गुलाबसींग पाडवी,शिवसेना युवा नेते जगदीश चित्रकथी,जसराज पवार,भूषण कोचर,विशाल कोळी,राजू पाडवी,श्याम लोहार,केतन वाडीले व आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments