Header Ads Widget


पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार बांधवांचा सत्कार.



साक्री ! sakri/LivenationNews
प्रतिनिधी/अकील शहा



दर्पणकार, आचार्य,बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती.
मराठी पत्रकार दिन. पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर राहून सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,क्रीडा व इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा नेहमीच मागोवा घेऊन वार्तांकनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यात सर्व माध्यमातील पत्रकारांचा सिंहाचा वाटा असतो,म्हणूनच पत्रकार बांधवांच्या या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे काल दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी साक्री शहर व तालुक्यातील सर्व माध्यमातील पत्रकार बांधवांचा सत्कार धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र उत्तमराव मराठे यांच्या वतीने करण्यात आला तसेच सर्वांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


या प्रसंगी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी किसान सभेचे सरचिटणीस गिरीश नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य विजय भामरे, धुळे जिल्हा राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष सयाजीराव ठाकरे, साक्री शहर राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष पराग अहिरराव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जेष्ठ आणि तरुण पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या आणि राजकारण्यांना व समाजातील सर्व घटकांना सत्याचा आरसा दाखविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या जेष्ठ आणि तरुण पत्रकार आणि वार्ताहरांचा सत्कार करतांना मनस्वी आनंद झाला असे मत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|