नंदुरबार / मुंबई:
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले खंबीर नेतृत्व माननीय श्री. राजेंद्र दादा गावित यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण राज्यातील विशेषतः आदिवासी बहुल भागातील कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राजेंद्र दादा गावित यांच्या प्रदीर्घ सामाजिक अनुभवाची आणि पक्षकार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
"आदरणीय राजेंद्र दादा गावित आपली महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि पक्षाची ताकद नक्कीच वाढेल, यात शंका नाही. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस उदंड आयुष्य आणि हार्दिक शुभेच्छा!"
राजेंद्र दादा गावित यांच्या नियुक्तीची घोषणा होताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून, तसेच नंदुरबार शहर व परिसरातील विविध समाजातील नागरिकांकडून त्यांचे प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले जात आहे.
आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच तत्पर राहिले असून, नवीन पदाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रात अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




0 Comments