Header Ads Widget


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचेच ! प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ


मोराणे प्रतिनिधी :- प्रकाश नाईक

मोराणे, धुळे:- दि.१४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती समूहांचेच होते. त्यांनी मानव मुक्तीसाठी अहोरात्र संघर्ष केला असे गौरव उद्गार मा.प्राचार्य डाॅ.विष्णू गुंजाळ यांनी काढले. 


या अभिवादन सभेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले. यामध्ये प्रा. डॉ. सुदाम राठोड, प्रा. डॉ. फरीदा खान, प्रा.डॉ. राहुल आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|