नंदुरबार प्रतिनिधी फहीम शेख : नॅशनल गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, भाषिक कौशल्ये विकसित व्हावीत आणि ज्ञानवृद्धी साधता यावी यासाठी चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी निवडक साहित्याचे वाचन करून आपल्या शैलीने सादरीकरण केले. यामध्ये कथा, निबंध, माहितीपर लेख तसेच प्रेरणादायी विचार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर रहीम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पालकवर्ग व शिक्षकांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवणारा ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम शाळेत राबवले जाणार असल्याचे अल्ताफ सरांनी सांगितले.
0 Comments