औरंगाबाद प्रतिनिधी : बीडमध्ये दोन आरोपींनी जिलेटिनने मशिदीत स्फोट केला. यातील आरोपींवर लावलेल्या कलम बघितले तर एक्प्लोझिव्ह ऍक्ट लावला आहे. हाच एक्झोसिव ऍक्ट वाचला तर ही केस UAPA अंतर्गत यायला पाहिजे होती. हेच कृत्य इम्तियाज जलील यांनी केलं असतं तर आतापर्यंत आमच्या घरावर बुलडोझर चालवलं असतं, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी बीड प्रकरणातील आरोपींवर लावलेल्या कलमांवर आक्षेप घेतला आहे आणि सरकारवर टीकास्त्र डागले. रमजान महिन्याच्या अंती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी रमजान ईदनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जलील म्हणाले की, बीड येथील मशिदीत दोन आरोपींनी जिलेटिनने स्फोट केला. यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली. त्याच आम्ही कौतुक केलं आहे. मात्र त्या आरोपींवर लावलेल्या कलम बघितले तर एक्प्लोझिव्ह अँक्ट लावला आहे. एक्प्लोझिव्ह ऍक्ट वाचला तर ही केस UAPA अंतर्गत यायला पाहिजे होती. हे कृत्य इम्तियाज जलील यांनी केलं असतं तर आमच्या घरावर बुलडोझर चालवला असता. या गुन्ह्यात छोटी कलमं लावून सरकार आरोपींना प्रोत्साहन देत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये कायदाचा नंगानाच सुरू आहे. तो महाराष्ट्रात दिसला नाही पाहिजे. नागपूरमधील दंगल करण्यात एखादा व्यक्ती सहभागी असेल तर त्याचे आई, वडील, मुल, पत्नी यांचा काय दोष? एक घर बनवण्यासाठी आयुष्य खर्च होतं आणि हे लोक वस्त्या उध्वस्त करत आहेत. हा कायदा चालवायचं असेल तर न्यायालयाला कुलूप लावा आणि सांगा दंडा राज चालणार आहे, असं सांगून टाका असं देखील जलील म्हणाले. अतिक्रमणामध्ये घर होतं तर नागपूर प्रशासन झोपलं होतं का? झक मारत होतं का? अतिक्रमणामध्ये घर तयार करताना मनपा अधिकाऱ्यांनी हरामचे पैसे घेतले असावे, असा आरोपही जलील यांनी केला.
'१५ हजार खिशात ठेवून मी ऑफिस फोडतो...'
नागपूर दंगलीमध्ये ज्यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही एक दिवस सुद्धा अटक करणार नाही का? ते लोक न्यायालयात जाताना फिरत फिरत गेल्याने फिरत फिरत आले. माध्यमांसमोर जेव्हा आले असे फोटो काढत होते जसे की त्यांनी देशासाठी खूप मोठं जंग जिंकून आले आहे. आणि कुणाल काम राणी काय छोटा चूक केला त्याच्या कार्यक्रमाचा ठिकाण असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे हॉटेल फोडून टाकतात. त्यांना पंधरा हजार रुपयात सोडून दिलं जातं. उद्या न्यायालयाला सांगतो माझ्याकडे पंधरा हजार रुपये मी ठेवतो आणि एखाद्याचा ऑफिस फोडतो मग तुम्हाला मलाही सोडावं लागेल. न्यायालयात सुरू असलेल्या न्यायदानाच्या प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो असं देखील इम्तियाज जलील म्हणाले. बातमी तयार करा ए ने
0 Comments