मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक
मोराणे :- आज दि.18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता समता शिक्षण संस्था संचालित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथे ग्रंथालया मार्फत आयोजित"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रम पंधरवड्याचा समारोपिय कार्यक्रमात वाचक लेखक सुसंवाद व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल गजेंद्र जगदेव यांनी केले होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथील माजी कुलसचिव मा.प्रा.डाॅ.एम.व्ही.बरिदे साहेब,मा.प्रा.आरती बरिदे व मा.प्रा.डाॅ.थोरात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सर्व सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मा.प्रा.आरती बरिदे यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत ग्रंथालयामार्फत उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. म्हणून कौतुक केले.तसेच वाचक लेखक सुसंवाद व्याख्यान कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मा.प्रा.डाॅ.घन श्यामजी थोरात सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वैचारिक साहित्य तुमच्या तर्क बुध्दीला आवाहन करते,
तुम्हाला अंतर्मुख करून भंडावून सोडते, ललित साहित्य तुम्हाला भावने कडे नेते तर वैचारिक साहित्य तुम्हाला अस्वस्थ करते.
सकस वाचन, खोल वाचन ही आजच्या काळात अनिवार्य बाब आहे.
ती कटाक्षाने आजच्या पिढीने वृंदिगत केली पाहिजे" असे अभ्यासपूर्ण चिंतन विश्व मराठी साहित्य परिषदेचे कायम सदस्य, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी द्वारा सन्मानित, मानसतज्ञ, विधी अभ्यासक प्रा.डॉ पंडित घनश्याम जी पुंडलिक थोरात यांनी व्यक्त केले. वाचक लेखक सुसंवाद साधताना त्यानी विविध ललित साहित्यावर आधारित चर्चा विमर्श मांडून सामजिक साहित्य शास्त्र , अभिजात मराठी भाषा, व्युतप्ती ,लक्षणा यांचे महत्व सांगत राष्ट्रपिता महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीन साहित्य विषयावर गंभीर प्रकाश टाकला. साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे,केशवसुत ,डॉ यशवंत मनोहर, बा सी मर्डेकर,बाबुराव बागुल, प्रतिभा रानडे, दुर्गाबाई भागवत, यांनी निर्मिलेले साहित्य विषय हे आजच्या पिढीने वाचले पाहिजे. "अर्थात्कतेचा शोध घेणं"ही मानवी प्रवृत्ती असून वाचन संस्कृती तीव्र करून अन्वेषण,शोध , चिकित्सा ही वृत्ती कायम ठेवली पाहिजे.पुढे त्यांनी सांगितले की" मेंदूचे वार्धक्य " हे निष्क्रीयते मुळे येते. त्याला उस्फुर्त ठेवण्यासाठी सतत चिंतन, मनन करणे गरजेचे आहे. डार्विन चा उत्क्रांती सिद्धांत इथेही कार्यरत असतो. ! डॉ पंडित घनश्याम जी यांनी अत्यंत अभास पूर्ण मांडणी करीत मेंदू विज्ञान आणि सामाजिक साहित्य शास्त्रांवर थक्क करणारी उदाहरणे देवून" वाचन संस्कृती टिकविण्यासाठी स्वतः हुन मनस्वी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी अध्यक्ष समारोप या कार्यक्रमात आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांची वाचनाची गोडी वाढवलेली आहे. हे आजच्या उपस्थितीवरून दिसून येते. प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्याबाबत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक प्राचार्य महोदय यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयातील वाचन संकल्प महाराष्ट्राच्या संयोजन समिती तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर,ग्रंथालय कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी सामूहिक राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. अशाप्रकारे महाविद्यालयात ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे
0 Comments