Header Ads Widget


नंदुरबार येथील दोन गटात वाद | संशितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू | अफवांवर विश्वाश न ठेवण्याचे आव्हान


नंदुरबार : दुपारच्या वेळेत नंदुरबार शहरात माळीवाडा येथील जाणाऱ्या धानोरा रस्ता परिसरात दारूच्या नशेत रिक्षा चालवत अपघात केला होता या अपघातात एक जण जखमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवले त्याचप्रमाणे शहरातील एका भागात दोन समुदायाच्या तरुणांमध्ये वाढ झाल्याची घटनाही समोर आली होती याप्रकरणी ही गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. 

दुपारची घटना शांत होत नसताना एकाएकी दोन गटात पुन्हा संध्याकाळी हाणामारी झाली, नूर ए इलाही चौक, हलवाई गली व माळीवाडा परिसरात झालेली या घटनेमुळे  संपुर्ण नंदुरबार शहरात भितीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही असामाजिक तत्वांनी केला होता नंदुरबार पोलीस दलाने तो प्रयत्न हाणुन पाडला असुन दोषींना अटक करण्याची कारवाई केली आहे व पुढील कारवाई अजुनही सुरू आहे तरी सर्वांनी शांतता ठेवावी व काहीही घटना घडाल्यास परस्पर वाद न करता सर्वप्रथम पोलीसांना कळवावे असे आवाहन नंदुरबार पोलीस दलाने केले आहे. हाणामारीचे कारण आत्ता  पर्यंत स्पष्ट झालेले नाहीत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आले.

शहराच्या एका भागात हाणामारी सुरू असल्याची खबर पोलिसांना कळवली. त्यानंतर काहीच मिनिटात पोलिस दाखल झाले, तोपर्यंत दोन्ही गट भिडले होते. काही वेळातच सर्वच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. विशिष्ट भागात झालेल्या हाणामारीचे लोण इतरत्र पोहचू नये,यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. शहराच्या इतर भागात मात्र पूर्णपणे शांतता असून व्यवहार सुरळीत आहेत.

यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत असून या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवहान पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे..

Post a Comment

0 Comments

Today is Saturday, April 12. | 1:07:47 PM