Header Ads Widget


सुन्नी दावने ईस्लामी एज्युकेशनल अॅण्ड मल्टीपरपज सोसायटी नंदुरबार संचलित हेरा इंग्लिश स्कुल ह्या शाळेत फूड प्रेस्टिव्हल कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

नंदुरबार (प्रतिनिधी) : फहीम शेख 

" सुन्नी दावने ईस्लामी एज्युकेशनल अॅण्ड मल्टीपरपज सोसायटी नंदुरबार. (संचलित) हेरा इंग्लिश स्कुल नंदुरबार ह्या शाळेत "फूड प्रेस्टिव्हल " हा मुस्लिम विविध खादय परंपरा आणि संभाव्य स्वयंपाक कौशल्य विकासनाचा' शालेय खादय महोत्सव' हा दिनांक 16 जानेवारी 2025 गुखार रोजी कार्यक्रम संपन्न झाला. 

सदर कार्यक्रमाचे माननिय चेअरमन मोहम्मद सईद नुरी मिर्झा ह्यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. 

त्या प्रसंगी 'संचालक मंडळ सदस्यांचे माननिय उपमुख्याध्यापक सो सिबतेन-रजा शेख त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माननिय मुख्याध्यापिका सो ह्यांचे मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनिनी सहभाग नोंदविला. शाळेच्या प्रांगणात विविध स्टॉल्स मधून खादय पदार्थ विक्री करून कमाई केली. 

विध्यार्थी वि‌द्यार्थिनी आणि त्यांचे पालक व शिक्षक शिक्षिकांनी आनंदाने विविध स्वादांचा अनुभव घेतला. कार्यक्रम यशस्वीततेसाठी शिक्षिका - रेहाना साहेब आणि शिक्षिका - मदिहा मिर्जा त्यांनी परीश्रम घेतले उपस्थित पालकांनी तया सवंर्वांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 11:46:40 AM