Header Ads Widget


अक्कलकुवा येथील खेतेश्वर स्वीट हॉटेल मधील धक्का दायक प्रकार.बुरशी लागलेली मिठाइ ग्राहकांना विक्री,अन्न व औषध प्रशासन झोपेत...


प्रतिनिधी : फईम शेख -
10 डिसेंबर रोजी दुपारी अक्कलकुवा येथील खेतेश्वर स्वीट येथून एका ग्राहकाने  मिठाई घेतली .सदर मिठाई घरी घेऊन ओपन केल्यावर अक्षरशः पूर्ण मिठाई ला बुरशी लागलेली आढळली व मिठाईचा खराब वास येत असल्याचे आढळून आले. या संदर्भात दुकानदाराला तक्रार केल्यावर पूर्ण मिठाई बघितली असता दुकानातील पूर्ण परात मधील मिठाई खराब व बुरशी लागलेली आढळून आली .आणि दुकानदार तीच मिठाई ग्राहकांना विकत आहे. दुकानदाराला विचारणा केल्यावर त्याने पैसे परत देत चूक मान्य केली व पैसे परत दिले परंतु याच्याने प्रश्न सुटणार आहे का?


अक्कलकुवा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष आहे का? या कडे शंका व्यक्त होत.संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल मध्ये नकली मावा पासून मिठाई बनवली जाते दिवाळी सारख्या सणा मध्ये देखील असे प्रकार घडतात. मिठाईचा नावाखाली नकली मावा पासून बनवण्यात येणाऱ्या मिठाई ग्राहकांना देण्यात येतात परंतु अन्न व औषध प्रशासन यावर गप्प का असते त्यांना या संदर्भात तक्रार केली की उडवा उडवी ची उत्तर देण्यात येतात. 


मग हे प्रशासन फक्त नावालाच आहे का या प्रशासनावर कोणाच्या वचक नाही का? अन्न व औषध प्रशासनाचे हॉटेल मालकांशी आर्थिक व्यवहार तर नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अक्कलकुवा सह संपूर्ण जिल्ह्यात हॉटेल मध्ये  स्वच्छता दिसत नाही त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर दिसत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकावर योग्य ती कार्यवाही करावी व अशा हॉटेलीना टाळा ठोकावा अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर उतरून  हॉटेल चालक व अन्न औषध प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारतील असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले आहे....

Post a Comment

0 Comments

|