Header Ads Widget


परिपूर्ण व्यक्तिमत्व काळाची गरज ! प्रा. डॉ. दिलीप घोंगडे

प्रकाश नाईक / मोराणे प्रतिनिधी 

मोराणे :- दिनांक १५ ऑक्टोबर  २०२४ रोजी  समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे च्या स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल आयोजित रेझुम प्रेपरेशन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी सदरील कार्यशाळेचा उद्देश उपस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगितला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला रेझूम नोकरीसाठी अद्यावत ठेवणे का? गरजेचे आहे. याबाबत आग्रही मांडणी केली. कार्यशाळेस शुभेच्छा देताना प्रा.  डॉ. रघुनाथ महाजन यांनी स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल चे विशेष कौतुक केले आणि सदरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रेझुम प्रेपरेशन कार्यशाळेमध्ये दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी भविष्यात तंतोतंत वापर करावा असा आशावाद ही व्यक्त केला. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंतर्गत गुणवत्ता सेलचे संचालक प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी रेझुम चे विविध प्रकार विशद केले. तसेच रेझुम मध्ये शैक्षणिक पात्रता अनुभव आणि मूल्यवर्धित कोर्सेस या संदर्भातील माहिती तसेच प्राप्त कौशल्य याच्याही नोंदी का करणे गरजेचे आहे याचे महत्त्व कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. तसेच कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आपला बायोडेटा, रेझूम, सीवी या सर्व विषया बाबत सविस्तर स्पष्ट मांडणी आपल्या भाषणातून  केली तसेच सदरील कार्यशाळा यशस्वी सादरीकरणासाठी पीपीटी च्या माध्यमातून प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये विषयाची सविस्तर मांडणी केली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मनोगत व्यक्त करताना मुन्ना पाडवी, प्रकाश नाईक, दिपाली गावित, लक्ष्मण जाधव, अरुणा मराठे, पल्लवी वाघ, अभय पाटील, जीवन भारुडे, गौरव नाईक या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यशाळा अतिशय व्यवस्थित आणि ज्ञाना मध्ये भर टाकणारी ठरली अशा भावना व्यक्त केल्या, एकूणच सदरील कार्यशाळेमुळे उपस्थित सर्व विद्यार्थी समाधानी दिसून आले. 

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार  अरुणा मराठे यांनी केले.

या कार्यशाळेमध्ये एम. एस. डब्ल्यू. भाग एक व एम. एस. डब्ल्यू. भाग दोन चे विद्यार्थी या रेझुम विषयी कार्यशाळेत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|