Header Ads Widget


मोफत कायदा सहायता ही अपूर्व देणगी! न्यायाधीश संदीप स्वामी


धुळे - प्रतिनिधी प्रकाश नाईक

धुळे :- समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे व जिल्हा विदेशी सेवा प्राधिकरण कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय कार्यशाळेमध्ये न्यायाधीश संदीप स्वामी यांनी मोफत कायदा हे अपूर्व देणगी आहे यासाठी समाज कार्याच्या प्रशिक्षणार्थ्यांनी समाजामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी आग्रही भूमिका याप्रसंगी व्यक्त केली. 

धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे कायदा साक्षरते संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्यायाधीश एडवोकेट संदीप स्वामी यांनी मोफत कायदा सहाय्यता ,पोक्सो अधिनियम, मनोधैर्य योजना, इत्यादी विषयी एम एस डब्ल्यू च्या प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले व अशा पद्धतीच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थी समाधानी दिसून आले.तसेच काही विद्यार्थ्यांनी विधी सेवा प्राधिकरणाची रचना व कार्यपद्धती समजून घेतली. जी समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी उपयोगी ठरेल अशा भावना सर्वांनी व्यक्त केले.

या प्रसंगी सामाजिक कायदा विषयाचे अध्यापक डॉ. सुदाम राठोड यांनी कार्यशाळेची प्रास्ताविका मांडली ज्यामध्ये कार्यशाळेचे ध्येय, उद्देश तसेच सदरील कार्यशाळेमध्ये मोफत कायदा सहायता प्राधिकरणाची रचना प्रशिक्षणार्थींना समजून आली तर निश्चितच भविष्यात हे सक्षम सामाजिक वकील म्हणून काम करू शकतील अशा भावना व्यक्त केल्या. तर कार्यशाळेचे आभार मयुरी जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|