धुळे प्रतिनिधी : प्रकाश नाईक
धुळे :- दिनांक 02 ऑक्टोबर 2024 समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे याच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंती चे औचित्य साधून' स्वच्छता ही सेवा व्रत' हा उपक्रम राबविण्यात आला, यामध्ये महाविद्यालय परिसरात व मोराणे गावातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवकांनी स्वच्छता रॅली काढून श्रमदानतून परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
त्यानंतर महात्मा गांधी जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रम सपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे धुळे चे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर होते, त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले,
यात महात्मा गांधी याची स्वच्छता आणि श्रमदान माध्यमातून व्यक्ती आणि राष्ट्र निर्माणची भूमिका आणि महात्मा गांधी याचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी आहे.तसेच स्वच्छता हे सेवा व्रत म्हणून युवकांनी आत्मसात करावे असा संदेश आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ.गुंजाळ यांनी युवकांना करून दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी
प्रा. डॉ. राहुल पंडित आहेर, तसेच महाविद्यालय चे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी केले, कार्यक्रमासाठी महाविद्यालयतील शिक्षक आणि शिक्षत्तेर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ.सुदाम राठोड यांनी केले.
0 Comments