Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त व्याख्यान


शहादा प्रतिनिधी : जुनैद अहमद 

शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रोफेसर मा. डॉ. डी. व्ही. सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे "राष्ट्रीय सेवा योजनेची ओळख आणि  भूमिका” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जी. एस. पाटील, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. वाय. बागुल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. ए. पडघन, प्रा. डॉ. आर. बी. मराठे, प्रा. एस. ए. पावरा यावेळी मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी माता सरस्वती प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रोफेसर डॉ. डी. व्ही. सोनवणे यांचा सत्कार व सन्मान स्नेह वस्र व  पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला.

प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येय, उद्दिष्टे व प्रमुख संकल्पना स्पष्ट केली. पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी प्रोफेसर डॉ. डी. व्ही. सोनवणे यांचा परिचय त्यांच्या कर्तुत्वातून मिळालेल्या पुरस्कारातून करून दिला. प्रमुक वक्ते प्रोफेसर डॉ. डी. व्ही. सोनवणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेची पार्श्वभूमी, राष्ट्रीय सेवा योजनेचे चिन्ह, उद्दिष्टे, कार्यपद्धती, एनएनएस व विद्यार्थी विकास, व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय सेवा योजनेतील संधी, श्रमदान, हिवाळी शिबीर, आव्हान, युवारंग, राज्यस्तरीय शिबीर, राष्ट्रीयस्तरीय शिबीर व आपले समाजाबद्दल असलेले ऋण आणि बांधिलकी या विविध मुद्यावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थांच्या जीवनाला कलाटणी देणारी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन व्यक्तिमत्व विकास  करणारी योजना असल्याने व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वतःहुन सक्रीय सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो प्रमुख प्रा. आर. के. पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. ए. पडघन यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय भैय्यासाहेब प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव माननीय, ताईसाहेब वर्षाताई जाधव, संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशु संजयजी जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू शिक्षकेतर बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments

|