Header Ads Widget


राष्ट्रीय सेवा योजनेची खरी देन सक्षम युवक होय ! प्रा. डॉ. हेमंत जोशी


मोराणे प्रतिनिधी / प्रकाश नाईक 

मोराणे :- धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना संबोधित करताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे धुळे विभागीय समन्वयक डॉ. हेमंत जोशी यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही एक चळवळ आहे आणि या चळवळीतून तयार झालेले स्वयंसेवक हे खरे सक्षम युवक ठरतात अशी आग्रही भूमिका मांडली. पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही एक चळवळ आहे जे या चळवळीत सक्रिय सहभाग घेतात त्यांचे व्यक्तिमत्व विकास होतो तसेच हे स्वयंसेवक सेवा भावाने प्रेरित असतात जे संकट कालीन परिस्थितीत समाज हितासाठी नव्हे तर राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या प्रसंगी प्रा. डॉ. प्रीती वाहने यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून उपस्थित स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सविस्तर मांडला व राष्ट्रीय सेवा योजनेचे जनक डॉ. व्ही के आर राव यांचे कार्य सविस्तर स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना चळवळीतून आरोग्य, स्वच्छता अभियान, आपत्कालीन शिक्षण व प्रशिक्षणाचे धडे दिले जातात. ज्यातून नेतृत्व गुण विकसित होतो अशीही मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक हे समाज हितासाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडणारे खरे शिल्पकार आहेत. या साठी सर्व सेवकांनी महाविद्यालयातील आयोजित उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अशी आग्रही मांडणी केली. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जिल्हा, विभाग, विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावे अशी अशा व्यक्त केली.

याप्रसंगी सहाय्यक  कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुदाम राठोड व प्रा. फरीदा खान यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविके मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी राष्ट्रीय सेवा  योजना दिनाचे महत्त्व तसेच उद्देश उपस्थितांना स्पष्ट केले. सादरील कार्यक्रम प्रसंगी विश्वजीत वाघ व अनिल बागुल यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंकिता कोरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. फरीदा खान यांनी मानले.

राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. हेमंत जोशी, प्रा. डॉ. फरीदा खान, प्रा. डॉ. सुदाम राठोड, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. प्रीती वाहने आणि एम. एस. डब्ल्यू व बी एस डब्ल्यू चे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|