Header Ads Widget


रतनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला बारा वृक्ष कुंडी जिल्हाध्यक्ष भरत सावंत यांनी दिली भेट


प्रतिनिधी :- शेख फहीम मोहम्मद 

तळोदा तालुक्यातील रतनपाडा जिल्हा परिषद शाळाला शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदला जिल्हाध्यक्ष भरत सावंत, व शिक्षक सेना नंदुरबार हे उपस्थित होते.  रतनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला बारा कुंडी व बारा वृक्ष भेट दिली.  या शिक्षण परिषदला तळोदा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी धनगर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, मोदल पाडा केंद्राचे केंद्रप्रमुख जगन मराठे व पतसंस्थेचे शाखा चेअरमन नंदुरबार चौरे सर, आबा आखाडे रतनपाडा शाळेचे मुख्याध्यापक दिनेश पाडवी, 

तसेच केंद्रातले सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

गट शिक्षणाधिकारी धनगर साहेब यांनी जिल्हाध्यक्ष भरत सावंत यांच्या सत्कार करून आभार मानले व केंद्रातील सर्व शिक्षकांनी भरत सावंत यांना खूप खूप शुभेच्छा दिले आहेत.

Post a Comment

0 Comments

|