Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात संशोधन कार्यपद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे: दिनांक 11 सप्टेंबर 2024. येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मराठी पदव्युत्तर विभाग अंतर्गत 'संशोधन कार्यपद्धती' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. संजयजी जाधव व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव मा. सौ. वर्षाताईसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी प्रा. डॉ. रवींद्र पाटील म्हणाले की, साहित्य आणि समाज यांच्या जवळचा संबंध आहे. एकाच्या अभावात दुसरा अपूर्ण आहे. संशोधनही समाजाशीच निगडित असते. संशोधनातून समाज विकासासाठीचे नवनीत निघायला हवे. पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी नवनव्या संशोधनासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एच. एस. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, साहित्य आणि समाज परस्पर पूरक आहेत. साहित्यातील अनेक क्षेत्रे नवसंशोधकांना खुणावत आहेत. नवनव्या क्षेत्रात दर्जेदार संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काळानुरूप त्यात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना सामोरे जात पुढे जाणारा खरा संशोधक असतो. संशोधनाचा हेतू नवसाहित्य निर्मिती करणारा हवा. समाजाप्रतीचा दृष्टिकोन हा संशोधनात्मक असला पाहिजे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नवनव्या क्षेत्रात संशोधन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रोशनी शिरसाठ, योगिनी धनगर, तेजस वसावे यांनी मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित तयार केलेल्या भितीपत्रकांचे महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पाटील तर आभार प्रकटन प्रा. कृष्णा सोनवणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|