नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: काल शहादा शहरातील सातव्या दिवशी विसर्जन होणा-या दुसऱ्या टप्प्यातील गणपती मिरवणुकीत सहभागी असलेल्या गणेशोत्सव मंडळातील समस्त गणेश भक्तांना सालाबादप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष राजेंद्रभैय्या अग्रवाल तसेच शहादा नागरी हित संघर्ष समिती शहादा चे प्रमुख यशवंत चौधरी यांनी सावित्रीबाई बी बन्सल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शहादा व श्री ऋण मुक्तेश्वर महादेव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा नगर पालिकेच्या समोरील चौकात खिचडी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राचार्य मकरंद पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले खिचडी महाप्रसाद वितरण कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटिल, शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक के डी पाटील, सुपडु खेडकर जयवंत मोरे, युवासेना शहरप्रमुख सागर मुकेश चौधरी, पत्रकार नरेंद्र बागले , वृषभ अग्रवाल , संकल्प ग्रुप चे प्रशांत कदम , भोई समाजाचे माजी अध्यक्ष अशोक शिवदे सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, रवि राऊळ, विजय चौधरी, मनोज वाडिले, नितीन चौधरी महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण हौसिंग सोसायटी चे सचिव जयेंद्र चव्हाण, शुभम चौधरी, मयुर चौधरी ,भुपेंद्र चौधरी, सिध्दांत बडगुजर, हृदयेश चव्हाण यांनी भेट देऊन खिचडी महाप्रसाद वितरित केला शेवटी यशवंत आण्णा चौधरी, राजेन्द्र अग्रवाल यांनी सर्व मान्यवरांच्या सोबत गणेश भक्तांचे आभार मानले.
0 Comments