नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य,महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ताण तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.के. पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. वजीह अशहर व महाविद्यालय परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ वाय. एच. वसु हे लाभले होते.पहिले व्याख्यान डॉ. वजीह अशहर यांचे झाले. त्यांनी परीक्षेतील मानसशास्त्रीय ताण कसा सोडवावा यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावा, मोबाईल पासून दूर राहावे, अभ्यासाचे नियोजन करावे, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व ताण आल्यास मित्रांशी बोलावे किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलावे यामुळे आपला ताण नाहीसा होतो असे प्रतिपादन केले.महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.वाय.एच.वसु यांनी परीक्षेतील गैरप्रकार व त्यानुसार होणाऱ्या शिक्षा याबद्दल सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार केला तर त्यांची गुणवत्ता रद्द केली जाऊ शकते किंवा ते पुढील परीक्षेपासून वंचित राहू शकतात असे प्रतिपादन केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉपी पासून दूर राहावे व अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एम.के.पटेल यांनी विद्यार्थ्यांना वर्गात नेहमीच उपस्थित राहून आपले प्रश्न, समस्याबाबत प्राध्यापकांचे मार्गदर्शन घ्यावे व परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा दालनात उपस्थित राहावे. त्यामुळे ताण येत नाही. विद्यार्थ्यांनी कॉपी पासून किंवा परीक्षेतील गैर प्रकारांपासून दूर राहावे असे सांगितले.या विशेष उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा .मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी केले.उपक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एम.के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एस. माळी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. पी. फुलपगारे, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जे. यू. चव्हाण, परीक्षा समितीचे प्रमुख डॉ.वाय.एच. वसु, प्रा. एस. एस.पवार व प्रा. राहुल पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. एस. माळी यांनी केले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments