Header Ads Widget


पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालयात गणरायाला वंदन.


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात श्रीगणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचे विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक पठण केले.या सामूहिक अर्थवशीष स्त्तोत्र पठन कार्यक्रमास महाविद्यालयातील 700 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर धार्मिक मूल्य रूजवणे ही काळाची गरज आहे.गणपती ही बुद्धीची देवता आहे.अध्यात्माने मन ,बुद्धी व हृदय शुद्ध राहून मुलांची स्मरणशक्ती टिकून राहते. देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुलांमध्ये गणपती उत्सवाचे मूळ उद्दिष्ट टिकून ठेवण्यासाठी असे उपक्रम होतात. यातूनच संघभावना वाढीस लागून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्काराची जडणघडण होते असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सौ. कल्पना पटेल यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश , प्रा.व्ही.सी. डोळे, प्रा.ए. ‌एम. पाटील, प्रा.ए. पी. पाटील व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|