Header Ads Widget


साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयात संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या संगणक प्रयोग शाळेचे उद्घाटन समन्वयक प्रा .मकरंद पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ .एम. के. पाटील,उपप्राचार्य कल्पना पटेल, प्रा.व्ही.सी.डोळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.विशाल भोसले, प्रा.वर्षा पाटील, प्रा. भारती पाटील,प्रा. मोनिका पाटील, प्रा.उर्मिला पावरा, प्रा.चंद्रकांत पाटील, संजय विसावे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

|