Header Ads Widget


शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच:राजेंद्र कुमार गावित

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे: शहादा - तळोदा मतदार संघ सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे. मतदार संघातील अनेक सहकार तत्त्वावरील उद्योग धंदे बंद आहेत .रोजगाराअभावी आदिवासी बांधवांचे स्थलांतर नित्याचेच झाले. त्यासोबतच मूलभूत सोयी सुविधांच्या अभाव आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे सर्व समावेशक सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान असणारा आमदार हवा अशी कार्यकर्त्यांनी भावनिक साद घातल्याने शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी स्पष्ट करत आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले. शहादा तळोदा मतदार संघातील राजेंद्र कुमार गावित समर्थक कार्यकर्त्यांची बोरद (ता. तळोदा) येथे संवाद बैठक झाली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपली भूमिका स्पष्ट करताना राजेंद्र कुमार गावित बोलत होते. यावेळी तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, तळोदयाचे माजी नगरसेवक हिरालाल पाडवी,सतिवान पाडवी, दत्तू भाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहर ठाकरे तर शहादा तालुक्यातून पंचायत समिती सदस्य प्रकाश पावरा ( वडगांव), जि. प. सदस्य योगेश दरबारसिंग पावरा (कुढावद),माजी पंचायत समिती सदस्य काशिराम ठाकरे (नांद्या),माजी जि. प. सदस्य धरमसिंग पावरा, चेअरमन शिवाजी कृषी प्रतिष्ठाण मंदाणाचे चेअरमन विजय मोरे,सुभाषभाई पटेल (म्हसावद),माजी पंचायत समिती सदस्य डॉ. आनंद पटेल, तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी सदस्य ईंश्वर पटेल, जबनभाऊ ठाकरे (प्रिंपी),दशरथदादा (उमरटी),राजु कोळी (म्हसावद) आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात मतदार संघातील समस्या विषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांनी तर मतदारसंघात गावगुंडांची दादागिरी सुरू असल्याचेही चर्चेद्वारे सांगितले. मतदारसंघातील सर्वाधिक गावे सपाटीवर असूनही त्या गावातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर अद्याप पावेतो रोखता आले नाही आजही त्यांना रोजगारासाठी परराज्यात जावे लागते त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागते. तालुक्यातील सहकार तत्वावरील अनेक प्रकल्प सध्या बंद आहेत. त्यामुळे रोजगार शोधण्याची वेळ मतदार संघातील नागरिकांवर आल्याची तीव्र भावना ही यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व मतदार संघातील मूलभूत समस्यांच्या अभावांचा पाढा वाचला होता. शेतकरी बांधवांनाही अनेक समस्यांनी ग्रासली आहे ठिबकचे अनुदान नाही तर कुठे मागील कर्जमाफीचे पैसे अद्यापही काहींना मिळाले नाही, आहे त्या योजनांचाही लाभ मिळवण्यासाठी सर्वत्र फरपट होते यांसह अनेक समस्यांच्या पाढा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून वाचण्यात आला.


" शहादा तळोदा मतदार संघात यापूर्वीही निवडणूक लढलो आहे.त्यात पराभूत होऊनही जनसंपर्क कायम ठेवला. नागरिकांच्या सुख दुःखात मदतीत नेहमी सरसावलो. कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील समस्यांच्या पाढाच वाचला. परिणामी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे."----राजेंद्र कुमार गावित ( अध्यक्ष देवमोगरा एज्युकेशन संस्था)

Post a Comment

0 Comments

|