नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यांतील मलोनी(लोणखेडा)येथील नुरानी वाचनाय तर्फे नुकतेच नीट परीक्षेत 653 गुण मिळऊन कोल्हापूर येथील शासकीय मेडीकल कॉलेजला एमबीबीएस साठी प्रवेश घेतलेला बामखेडा ह मु लोणखेडा येथील धरमदास तुंबा पाटील यांचा चि. ध्रुव पाटील यांच्या व शहादा येथील महेंद्र हिरालाल चौधरी (बामखेडा) यांच्या चि. दिवेश चौधरी यास नीट परीक्षेत 648 गुण मिळऊन त्याचा अकोला येथील शासकीय मेडिकल कॉलेजला एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला म्हणुन त्यांचा सत्कार जेष्ठ समाजसेवक व वाचनालयाचे अध्यक्ष हैदरअली नुरानी यांचे हस्ते करण्यात आला या वेळी शहादा येथील साने गुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, लोणखेडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील सचिव गुलाबराव पवार, सुभाष पाटील ग्रंथपाल ज्योती पाटील , सखाराम पाटील जायन्टसच्या मनिषा हरी पाटील, फेसकॉमचे सदस्य रामभाई पाटील धोंडू पाटील आदी उपस्थित होते.या वेळीं हैदरअली नुरानी म्हणाले की विद्यार्थ्याना आई वडिलांनी दिलेला सल्ला कडवट असेल पण जीवनाला दिशा देणारे असतात तरी त्या कडे दुर्लक्ष करु नका.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माणक चौधरी यांनी केलें तर आभार ज्योती पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदस्याची परिश्रम घेतले.
0 Comments