Header Ads Widget


आमदार राजेश दादा पाडवी यांनी दिला 46% जळालेला रुग्णाला दिलासा!

  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:गजानन पावरा रा. वडगाव यांच्या सात वर्षाचा मुलाचं दुर्दैवाने आगीत सापडल्याने 46% शरीराची त्वचा जळीत झाली असून त्यांनी जिल्ह्यातील खाजगी तसेच सहकारी रुग्णालय मध्ये दाखल केले. मात्र तरीही योग्य उपचार न मिळाल्याने आदित्य पावरा यांच्यात प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यात हालाखीची परिस्थिती असल्याने नामांकित हॉस्पिटमध्ये उपचार घेण्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे संपूर्ण परिवार सतत काळजीत होते. अशावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. आमदार पाडवीनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य पावरा यांना तातडीने आपल्या रुग्णवाहिका देऊन मुंबई येथील नामांकित केम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया साठी आदित्यला दाखल करण्यात आले होते.आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी यांनी केम हॉस्पिटल मध्ये जाऊन आदित्य व त्याच्या कुटुंबाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी के.एम रुग्णालयाचे डीन डॉ.बांगर यांच्याशी आदित्यच्या प्रकृती संदर्भात सविस्तर चर्चा करत उपचारासाठी कुठलीही कमतरता भासू नये यासाठी सूचना केल्यात.

Post a Comment

0 Comments

|