Header Ads Widget


जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी आपल्या नातूच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट शर्ट वाटप..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:काथरर्दे-दिगर तालुका शहादा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी आपल्या नातूच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट शर्ट वाटप करून आगळा वेगळा उपक्रम केल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.वाढदिवस साजरा करणे हे आता नवीन राहिलेले नाही.मात्र काही जण वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठी व सामाजिक हित जोपासण्यासाठी वेगळ्या पद्धतीने उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरे करत असतात त्याचे उत्तम उदाहरण मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून दाखवलेले आहे. साधारणतः५० ते ६० मुलांना गणवेश वाटप केले.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी.राजपूत सरपंच कमाबाई भिल शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कृष्णा ठाकरे उपस्थित होते.शिक्षण विस्तार अधिकारी राजपूत यांनी मार्गदर्शन करून मुख्याध्यापकाच्या उपक्रमाचे कौतुक केले.शिक्षणासारख्या क्षेत्रात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर शिक्षकांनी देखील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या आदर्श घ्यावा.ग्रामीण भागात अशा उपक्रमांची आवश्यकता आहे असे आवाहन वैजाली तालुका शहादा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|