Header Ads Widget


राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तर एकका तर्फे हुतात्मा दिन व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा...



  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:अनुभवा सारख शिक्षण संसारात नाहीच. आजी आजोबा हे संस्काराची खान आहे. त्यांचे संस्कार चांगले असतील तर संस्कारक्षम पाल्य घालून देश हिताचे काम होते. संस्कारातून बलिदान तयार होते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाल शहीद शिरीष कुमार असे प्रतिपादन डॉक्टर मनोज शेवाळे यांनी केले वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तर एकका तर्फे हुतात्मा दिन व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आणि शाळेचे प्राचार्य महेंद्र मोरे, उप प्राचार्य जे बी पवार, कार्यक्रमाधिकारी प्रा एस जे वळवी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर शेवाळे म्हणाले मूल्य शिक्षणात संस्काराचे धडे दिले जात होते ते मूल्य शिक्षण आज दिसत नाही. आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात त्याची जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. आजची पिढी ही भरकटत चालली आहे. उच्चशिक्षित तरुण तरुणी मला नको मला साक्षर असलेले तरुण-तरुणी हवे आहे. साक्षर म्हणजे केवळ वाचता लिहिता येणे असे होत नाही. ज्याला वास्तविकतेची मानवतेची जाणीव आहे ते साक्षर हवे आहेत.आजच्या तरुण पिढीने शिरीष कुमार यांचे आचार विचार घेऊन जीवन जगणे गरजेचे आहे. आजच्या पिढीला बलिदानाची गरज नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट याला तिरंग्याचे स्टेटस ठेवतो. पण तो दिवस गेला की तिरंग्याची कर्तव्य विसरलेली असतात. अशी पिढी देशसेवा घडवण्यासाठी कामी येणार नाही. यासाठी सर्वांनी अंतर्मनातूनतयार झाल पाहिजे. बहिणाबाई चौधरी, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या लोकांनी केलेल्या कार्याची दखल डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे. व त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा ओगले जी व्ही यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments

|