नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील गोमाई नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी त्यांना आरोग्याच्या दृष्टीने व विसर्जन करतांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून शहादा नगरपालिका व सेवाभावी म्हणून सामाजिक सेवा देणाऱ्या संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहीम राबवितांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे संकल्प ग्रुप अध्यक्ष पिनाकीन पटेल सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण राकेश कोचर प्रशांत कदम नगरपालिका स्वच्छता निरीक्षक राहुल थोरात गोटू तावडे स अन्य सदस्य सहभागी झाले होते. शहादा शहरात गणेश विसर्जन चार टप्प्यात पाचव्या सातव्या नव्या व अनंत चतुर्थीला होत असते त्या आधारावर.नदीला वेळोवेळी पूर आल्याने शिवाय नागरिकांनी केरकचरा टाकल्याने गोमाई नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात केरकचरा गोळा झालेला होता.गणपतीची विसर्जन करतांना परिसर स्वच्छ असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून जेसीपी यंत्र लावून तसेच संकल्प ग्रुपचे सदस्य स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांनी केर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
0 Comments