नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील दिन दयाल नगर मधील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या गणपतीची आरती दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता नंदुरबार येथील नूतन जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आल्याने परिसरातील गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक वर्षापासून नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या आवारात समितीमार्फत गणेश उत्सवात गणपतीची स्थापना केली जात असते.गणपतीच्या आरतीसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित केले जाते.जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या सोबत जिल्हा शिवसेनाप्रमुख अरुण चौधरी माजी नगरसेवक व तैलिक समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा मकरंद पाटील उद्योजक नुहभाई नुरानी प्रख्यात विधीतज्ञ ॲड.राजेश कुलकर्णी तहसीलदार दीपक गिरासे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे सह मान्यवरांनी गणपतीची आरती केली.जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचे शिवछत्रपती महिला ग्रुप तर्फे सन्मान करण्यात आला.शिवछत्रपती ग्रुपचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी आभार व्यक्त केले तर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी उपस्थित गणेश भक्तांना गणेश उत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.
0 Comments