Header Ads Widget


लालदास देसाई यांच्या स्मारकाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन ...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील हुतात्मा लालदास चौकात नऊ सप्टेंबर शहीद दिनानिमित्त सकाळी ९ वाजता राष्ट्र सेवा त्याला तर्फे जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी.पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा येथील नंदुरबार येथे इंग्रजांच्या विरोधात शाळकरी मुलांनी चले जाव चळवळीत काढलेल्या मोर्चात गोळीबारात शहीद झालेल्या लालदास देसाई यांच्या स्मारकाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. विश्वासराव पाटील ॲड.गोविंद पाटील.ॲडव.मुस्ताक शाहेद ॲड. संगीता पाटील राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारणी सदस्य कैलास भावसार ज्येष्ठ कार्यकर्ते मानक चौधरी शहीद लालदास देसाई यांचे पुतणे जयेश देसाई धनसुख देसाई नगरपालिका कर्मचारी सह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून बाल शहीद लालदास देसाई यांना अभिवादन केले. यावेळी बोलतांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. विश्वासराव पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बालशहिदांनी प्राणाची आहुती दिली ती अनमोल आहे.शहिदांनी देशाला मिळून दिलेल्या स्वातंत्र्याचे जतन करावे.शहादा येथील बाल शहीद लालदाद देसाई यांनी देखील देशासाठी बलिदान दिले ते अनमोल आहे असे सांगितले.तर मानक चौधरी यांनी शहिदांवर देशभक्तीपर कविता सादर केली.

Post a Comment

0 Comments

|