Header Ads Widget


सिद्धी विनायक गणपती मंदिराच्या आवारात शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता भव्य अशा सामूहिक महाआरतीचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील डोंगरगाव रस्त्यावरील बस स्थानकाच्या मागे असलेल्या प्रख्यात अशा सिद्धी विनायक गणपती मंदिराच्या आवारात शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता भव्य अशा सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमच अशा प्रकारच्या सामूहिक महाआरतीचे आयोजन केल्याबद्दल गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.शहर सह परिसरात या महाआरतीची चर्चा केली जात आहे.गेल्या चार-पाच दिवसापासून शहादा येथील संकल्प ग्रुप उमंग नारी ग्रुप अभिजीत पाटील मित्र मंडळ परिवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महा आरती बाबत गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलेले होते.विशेष म्हणजे जोडप्यांसहित उपस्थित राहण्याविषयी आग्रह देखील करण्यात आलेले होते.शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी महाआरतीची तयारी केलेली होती ती लक्षणीय होती.विशेष म्हणजे महाआरतीसाठी गणेश भक्तांनी पूजेचे साहित्य व पूजेच्या ताट आरती घरूनच आणलेली होती.साधारणता पाचशे ते सहाशे गणेश भक्त महा आरतीला उपस्थित होते.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह होता.उपस्थित सगळ्यांनी गणपतीची आरती केली.गणेश भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.जिल्ह्यात पहिल्यांदाच गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीसाठी महाआरतीचे आयोजन करण्याचे उदाहरण आहे.ज्याला गणेश भक्तांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.साधारणता एक तास भक्तिमय वातावरण होते.सामूहिक आरती नंतर महिला गणेश भक्तांनी गरबा नृत्य केले.सिद्धिविनायक मंदिरातली गणपतीची मूर्ती पूर्णतः पितळीचा धातूपासून बनवलेली आहे जी एकमेव मूर्ती या परिसरात आहे. महाआरतीमध्ये शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा संकल्प ग्रुपचे अध्यक्ष पिनाकिन पटेल नंदुरबार येथील राजेंद्र कुमार गावित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुरेश नाईक प्रकाशा येथील हरि दत्तू पाटील देवकीभाई पटेल मीनानाथ सोनार सह अनेक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक व्यापारी पुजारी विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी सहभागी झालेले होते.महाआरतीत गणरायाला शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली.देशाची सुरक्षिता व प्रगती व्हावी.शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत शहादा शहर सह परिसराच्या विकास व्हावा.गणरायाने प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखमय करू अशी मी प्रार्थना केली-अभिजीत पाटील-सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा.

Post a Comment

0 Comments

|