Header Ads Widget


शहादा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे : 
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात दि.10 सप्टेंबर रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. एम. के. पटेल यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.केशव कोळी हे उपस्थित होते.यावेळी मेळाव्याचे प्रमुख अतिथी प्रा. केशव कोळी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा .डॉ. एम. के. पटेल यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागातील वरिष्ठ प्रा. डॉ. सुनील पाठक यांनी सादर केले.प्रमुख अतिथी प्रा.कोळी यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करतांना त्यांचा महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवास, वनस्पतीशास्त्र विषयातील संधी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पटेल यांनी माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या जडण-घडण आणि प्रगतीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी हर्षल सूर्यवंशी तर आभार प्रकटन प्रा.निलेश आठवले यांनी केले. माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ.संतोष तायडे, प्रा. विजया पाटील,डॉ. सुनील पाठक, प्रा. निलेश आठवले, डॉ. महेश जगताप, प्रा. जागृती पाटील,अशोक पाटील, राहुल बागले आणि विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थी मेळावा उपक्रमाचे संस्थाध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल आणि उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

|