Header Ads Widget


शहादा ते वैजाली दरम्यान च्या रस्त्याची दयनीय दुरावस्था झालेली असून रस्त्याची पूर्णपणे चाळणी झालेली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील शहादा ते वैजाली दरम्यान च्या रस्त्याची दयनीय दुरावस्था झालेली असून रस्त्याची पूर्णपणे चाळणी झालेली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली असून रस्त्याचे अत्यंत निकृष्टपणे होताना दिसून येत आहे याबाबत नागरिक व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केले असून आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला आहे. शहादा भादा व्हाया वैजाली हा बारा किलोमीटर अंतराचा रस्ता असून सदर रस्त्यावरून गेल्या पाच महिन्यापासून डामरखेडा येथील पुल बंद असल्याने व नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथील वाहतूक बंद असून भादे मार्गे सध्या वाहतूक सुरू आहे या रस्त्याने अवजड वाहने राज्य महामंडळाच्या एसटी बसेस तसेच खाजगी वाहने दुचाकी चार चाकी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जात असल्याने रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तसेच चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे याबाबत नागरिक व वाहन धारकांनी लोकप्रतिनिधीं कडे तक्रार केलेली होती त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी दखल घेऊन रस्त्याचे डाग दगुजीचे काम सुरू केलेले असून अत्यंत निकृष्टपणे काम सुरू आहे याबाबत परिसरातील नागरिक व वाहनधारक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेले असून संबंधित विभागाने याबाबत दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी अशी परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मागणी आहे त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments

|