अक्कलकुवा /प्रतिनिधी:सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना माझ्या हातुन चांगले काम व्हावे या हेतूने मी अंगणवाडी सेविका सह अनेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत असल्याने तुमच्या कामांचे कौतुक व्हावे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यासाठी तुम्ही उत्कृष्ट काम केले म्हणून अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. असे प्रतिपादन खापर,रायसिंगपूर, होराफळी व मोरांबा बिटातील सर्व अंगणवाडी सेविका व खापर जिल्हा परिषद गटातील। शिवदुत, बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना केले.विधानपरिषदेचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली खापर जिल्हा परिषद गटाची बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून कोराई येथील इरा इंटरनॅशनल स्कूल च्या प्रांगणात अंगणवाडी ताईंना अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार आमश्या दादा पाडवी यांचा सत्कार इरा इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष योगेश भाऊ सोनार यांनी केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक कान्हा नाईक, जोलू वळवी, टेडग्या वसावे,राजु पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ, संध्या पाटील,संतोष पवार सोरापाडा सरपंच अंजुताई पाडवी, कुवरसिंग पाडवी, अक्षय सोनार,सिंधु वसावे, सरला वळवी, रवि पाडवी,मनोज चौधरी,सुनील पाडवी, जी. डी. पाडवी,सुनिता पाडवी, भाऊसिंग वसावे तसेच कार्यकर्ते व खापर, रायसिंगपुर मोरांबा होराफळी बिटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते यावेळी उपस्थित शिवदुत,पन्ना प्रमुख व बुथ प्रमुखांना टि शर्ट वितरित करण्यात आले या बैठकीत आमदार आमश्या दादा पाडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते,शिक्षण स्थलांतर,रोजगार या विषयावर सत्य कथन वेळोवेळी सरकार कडे माझ्या भाषणांच्या माध्यमातून मांडतो म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्कार मिळाला.यावेळी युवा सेनेचे ललितकुमार जाट, माजी जिल्हा परिषद सदस्य संध्या पाटील यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांनी तर आभार योगेश सोनार यांनी मानलेत.
0 Comments