Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयातील भूगोल विभागात अंतराळ दिवस साजरा...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने अंतराळ दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. डी वाय पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भूगोल विभागातील ज्येष्ठ प्रा.आर के पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी भूगोलाचे प्रतिक म्हणून पृथ्वी गोलाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला प्रा. आर .के. पाटील यांनी चंद्रयान मोहीम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मागील वर्षी १४ जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केलेले चंद्रयान -३ हे अवकाशात 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले व भारत हा जगातील दक्षिण ध्रुवावर पाय रोवणारा पहिला देश ठरला. म्हणूनच 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना अंतराळ याविषयीच्या अनेक संकल्पना यांची सांगड भूगोलाची घालत अंतराळ दिवसाचे महत्त्व पटवून दिले. तर अध्यक्ष समारोपात भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. वाय .पाटील यांनी अवकाशातील ग्रहगोल, तारे, पृथ्वीची कक्षा, सूर्याची निर्मिती, सौरमंडल, चंद्रयान, कृत्रिम उपग्रह, रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस. यांचा भूगोलाच्या अभ्यासात होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आधुनिक काळात भूगोलशास्त्रात नवनवीन संकल्पना अंतर्भूत करून भूगोलशास्त्राचा विकास होत आहे ,आणि म्हणून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भूगोलशास्त्राकडे बघितले पाहिजे. नवनवीन संकल्पनांचा अभ्यास करावा असे अहवान केले. याच प्रसंगी भूगोल विभागातील योगेश मानेज, प्रार्थना पाटील, कामिनी जाधव, योगिता गिरासे, महेंद्र पावरा ,या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमात भूगोल विभागातील द्वितीय व तृतीय वर्ष कला आणि द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रा. धिरसिंग पाडवी यांनी केले ,तर प्राध्यापक पितांबर वळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठीभूगोल विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक भरत पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

|