Header Ads Widget


विद्यार्थ्यांना देशातील आर्थिक ज्ञान मिळावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी आर्थिक बातमीपत्र फलकाचे उद्घाटन ...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
शहादा येथील वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयात दिनांक दाेन सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना देशातील आर्थिक ज्ञान मिळावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी आर्थिक बातमीपत्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले. आर्थिक बातमीपत्र फलकाचे उद्घाटन सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सनदी लेखापाल शैलेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशू जाधव प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुमार पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. संजय जाधव यांनी आर्थिक वृत्त संकलनातून ज्ञानाच्या पक्षाच्या विस्तारास चालना मिळेल.आर्थिक बातमीपत्र फलक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमास उपयुक्त ठरेल त्याच्या लाभ विद्यार्थ्यांनी घ्याव्या असे सांगून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात प्रा. डॉ. मनोज गायकवाड यांनी महाविद्यालयात वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्यात आर्थिक बातमीपत्र फलक हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.विद्यार्थ्यांचे कार्यकारी मंडळ असून प्रत्येक आठवड्यात आर्थिक घडामोडींचे वृत्तसंकलन करून फलकावर लावली जाईल.विद्यार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक घडामोडीचे ज्ञान मिळेल अशी माहिती दिली.प्रास्ताविक प्रा. मनोज गायकवाड यांनी केले तर उपस्थित आमचे आभार प्रा.एस.के.पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|