नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात स्व.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक ६ सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. उबाठा गटाचे जिल्हा शिवसेनाप्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते स्व.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच शिवसैनिकांनी अभिवादन केले.जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.यावेळी शहर प्रमुख सागर चौधरी उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी गणेश चित्रकथे सुरेश मोरे भगवान अलकारी बापू चौधरी रमेश कुवर दिलीप पाटील वसंत पवार उत्तम पाटील सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments