Header Ads Widget


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचाचे वाटप लाभार्थ्यांना ना डॉ. गावित यांच्या हस्ते वाटप...


   नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:  गेल्या २५ वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर व गावापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुदायिक बाबतच्या योजना पोहचल्या आहेत. राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी झाली नसेल एवढ्या योजना एकट्या नंदुरबार जिल्ह्यात राबविले आहेत. येणाऱ्या काळातील त्यांची अंमलबजावणीतील सातत्य कायम राहील काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सातत्याने उभे राहावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांनी वैजाली येथे बोलताना केले.तालुक्यातील वैजाली सह मोहिदे तसेच जिल्हा परिषद गटातील गावांमधील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचाचे वाटप लाभार्थ्यांना नामदार डॉक्टर गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचां अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद बांधकाम सभापती हेमलता शितोळे, उद्योजक शशिकांत पाटील,पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे, भाजपा तालुका अध्यक्ष विजय पाटील, माजी उपसभापती सुनील पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील,सरपंच सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच बुधा पाटील, संदीप पाटील, डॉ.जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. एच. नुकते यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  पुढे बोलताना गावित म्हणाले की जिल्ह्याच्या निर्मितीपासून आज तागायत शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी आहेत त्या राबविण्यासाठी शासन दरबारी आग्रही राहिलो आहे, मागेल त्याला योजनेच्या लाभ दिला आहे. गरजेप्रमाणे योजना हे सूत्र लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर योजनाची आखणी व अंमलबजावणी केलेली आहे. येथील माणूस माती आणि शेतीच्या विकासासाठी शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. आज कामगार कल्याण मंडळाचे पेटी व भांडे वाटपाचा कार्यक्रम घेऊन न्याय देण्याच्या प्रयत्न असल्याचे सांगितले. हेमलता शितोळे, विजय पाटील, डॉक्टर जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|