Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककात सहभागी स्वयंसेवकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन..

   

 


  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककात सहभागी स्वयंसेवकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे सचिव प्रा संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्गाचे उद्घाटन सोनामायी शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांनी केले याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे डॉक्टर राजेंद्र पाटील, प्रशासकीय प्रमुख प्रा हिमांशू जाधव प्रभारी प्राचार्य डॉक्टर संतोष पाटील मंचावर उपस्थित होते. 

उद्बोधन वर्गाचे प्रमुख वक्ते डॉ राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उदाहरणातून मार्गदर्शन केले जे जे आणि जेवढे केले त्याचे फळ आपल्या अभ्यासातून मिळाले आहे परंतु हे केवळ आपल्या पुरतेच मर्यादित असल्याने रा से यो च्या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी विशेष केले तर आपल्या पदरात निश्चित जास्तीचे पडेल. आपण समाजासाठी काहीतरी विशेष केले तर आपल्या पदरात निश्चित जास्तीचे पडेल अभ्यास करून दिलेली परीक्षा ही व्यक्ती घडविते तर रासेयो तून व्यक्तिमत्व घडते . विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे व्यासपीठ आपले विचार व्यापक करते. त्याच्या उपयोग करून आपण समाज विकसित करावा असे आवाहन त्यांनी केले याशिवाय माय भारत पोर्टल हा सायबर सुरक्षा विषयी त्यांनी उपयुक्त माहिती दिली .या वर्गाचां उद्घाटन प्रसंगी वर्षा जाधव यांनी सांगितले की रासेयो आपल्या सर्वांना सोबत घेऊन चालणे शिकविते. आपल्या सुंदर जीवनात मित्र असावे पण जीवाला जीव लावणारे व भरवशाचे असावेत यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःशीच मैत्री करून स्वयंपूर्ण व्हावे. मोबाईल हा तुम्हाला मित्र वाटत असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या जीवनावर होतात . ट्विटर फेसबुक वापरण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे फेस हे बुक मध्ये असणे जास्त हितकारक आहे तसेच आजचे दूषित वातावरण बघता नारी सुरक्षेची काळजी युवांनी घेणे गरजेचे असल्याचे आव्हान त्यांनी केले. संस्थेचे सचिव प्रा जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना चतुर सायबर गुन्हेगारांच्या भुलथापांना बळी पडू नका व विविध फॉर्मची फी ऑनलाईन अदा करताना सावधानता बाळगावी. सायबर कॅफेवर आपले काम पूर्ण होताच सर्व डाटा काळजीपूर्वक डिलीट करावा. अन्यथा त्याच्या गैरवापर होऊन आर्थिक फटका बसू शकतो याप्रसंगी कबचौ उ म वी जळगाव व ग तू पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे आयोजित रासेयों विशेष शिबिरात सहभागी होणारे तृतीय वर्ष कलाचे विद्यार्थी राज वळवी व संतोष पावरा या रासेयो स्वयंसेवकाच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ अशोक तायडे कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय कार्यक्रमाधिकारी प्रा आर के पाटील तर आभार प्राध्यापक गणेश पडघन यांनी मानले. कार्यक्रमात कला व विज्ञान विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments

|