Header Ads Widget


१४ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आगळी वेगळी सुंदर अशी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात दिनांक १४ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आगळी वेगळी सुंदर अशी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव होत्या.यावेळी प्राचार्य महेंद्र मोरे उपमुख्याध्यापक जे.एम. पाटील पर्यवेक्षक अनिल खेडकर पर्यवेक्षक ए. ए.खान उपस्थित होते.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला होता त्या आधाराव त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना महापुरुषांची व क्रांतिकारकांची माहिती व्हावी म्हणून फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या त्यात क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रांतिकारी खाज्या नाईक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर स्वामी विवेकानंद वकील सह अन्य वेशभूषा परिधान केलेल्या होत्या.वेगवेगळ्या वेशभूषा पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.सर्व वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गुंजाळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|