Header Ads Widget


धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे समाजकार्य महाविद्यालयात, शालेय समाजकार्याची गरज, शालेय समाजकार्यकर्त्याची भूमिका जबाबदाऱ्या या विषयावर वेबिनार संपन्न...

 


मोराणे /प्रतिनिधी: मोराणे  समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे आणि महाराष्ट्र असोशिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (MASWE) यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य पंधरवडा ‘इतरांचा आदर - महिलांचा सन्मान’ व शिव्यामुक्त समाज अभियान दिनांक 09 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित केला असून याचाच एक भाग म्हणून दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी शालेय समाजकार्याची गरज आणि शालेय समाजकार्यकर्त्याची भूमिका व जबाबदाऱ्या या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. विष्णू गुंजाळ , प्रमुख वक्ते प्रो. अतुल प्रताप सिंह (सामाजिक कार्य विभाग,डॉ. भीमराव आंबेडकर कॉलेज,दिल्ली विद्यापीठ), समाजकार्य पंधरवडाचे समन्वयक प्रा. डॉ. रघुनाथ महाजन तसेच विभाग प्रमुख डॉ. गोपाळ निंबाळकर हे ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले होते तर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.एस.डब्लू.आणि एस.वाय.बी.एस.डब्लू. वर्गातील विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. या वेबिनारचे प्रास्ताविक प्रा.डॉ. रघुनाथ महाजन यांनी केले. त्यामध्ये त्यांनी सदर समाजकार्य पंधरवडा ‘इतरांचा आदर - महिलांचा सन्मान’ व शिव्यामुक्त समाज अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रमुख वक्ते प्रो. अतुल प्रताप सिंह यांनी शालेय समाजकार्याची गरज आणि शालेय समाजकार्यकर्त्याची भूमिका व जबाबदाऱ्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजकार्याच्या सर्व सहा पध्दतीचा शालेय समाजकार्यकर्त्या पूर्णपणे उपयोग करू शकतो. शालेय समाजकार्य करताना विद्यार्थ्यांची कामगिरी, शिक्षणातील संधी, स्क्रीनचे व्यसन,आंतरवैयक्तिक संबंध, वर्तन विश्लेशन, स्व- शिस्त यासारख्या व्यापक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.  त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. विष्णू गुंजाळ यांनी अध्यक्षीय समारोप करताना शालेय समाजकार्य करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्यामध्ये व्यक्ती सहयोग कार्य आणि गट कार्यात नवनवीन पद्धतींचा उपयोग करून ज़िल्हा परिषदेत शिकत असलेल्या मुलानांच्या व्यक्तिमत्व विकासावर जास्त भर द्यावा. तसेच त्याना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी गटकार्याच्या माध्यमातून विकत्सात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे. असे सांगितले. सदर वेबिनारचे आयोजन आणि नियोजन महाविद्यालयातील आजीवन शिक्षण कक्षाच्या समन्वय प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले. वेबिनारला महाविद्यालयातील एफ.वाय.बी.एस.डब्लू.आणि एस.वाय.बी.एस.डब्लू. वर्गातील ६६ विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

|